NEWS
वसुधैव कुटुंबकम् संस्थेच्या वतीने मतदान जनजागृती अभियान.
लोकशाहीत आपण मतदान करणे हा आपला अधिकार तर आहे पण त्याचं बरोबर ह्या देशातील प्रत्येक नागरिकाचे नैतिक कर्तव्य देखील आहे. आणि म्हणून प्रयेक नागरिकांनी जाणीवपूर्वक आपले कार्तव्य पूर्ण करून ह्या लोशाहीला अधिक बळकट करण्यासाठी पुढे यावे यासाठी संस्थेच्या वतीने ठीक ठिकाणी बॅनर लावून मतदान संकल्प स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले.सर्व जनतेला मतदानचे महत्व कळावे आणि नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावे असे अहवान यावेळी मतदान स्वाक्षरी अभियान घेऊन करण्यात आले.ह्या अभियानात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. तरुण,महिला, व जेष्ठ नागरिकांनी ह्या स्वाक्षरी अभियानात आपली स्वाक्षीरी देऊन ह्या लोकसभा निवडणुकीत नक्की मतदान करणार असा संकल्प केला.