Welcome to Vasudhaiva Kutumbakam
For the following scope of activities
वसुधैव कुटुम्बकम हि एक अशी संस्था आहे जी ह्या तत्वावर विशास ठेवते की, सर्व सामान्य व्यक्तींना उत्तम दर्ज्याचे शिक्षण,आरोग्य, व स्वच्छ पर्यवरण मिळवून देणे हा त्यांचा मुलभूत मानिवाय अधिकार आहे. आणि हा त्यांना मिलाच पाहिजे. तसेच प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम दर्ज्याच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत ह्या करिता आम्ही शेतकरी, विद्यार्थी व महिला ह्यांच्या शिक्षण,आरोग्य व पर्यवरण पूरक विकासाची पूर्ण क्षमता विकसित करण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे. त्यासाठी जन जागृती,शिक्षण,प्रशिक्षण देवून एक सशक्त समाज घडवू पाहत आहोत.
आमचा प्रवास एका साध्या पण सशक्त दृष्टीने सुरू झाला. सर्व समाजातील समुदायांना सशक्त करण्यासाठी आणि उज्वल भविष्याकडे मार्ग दाखवण्यासाठी समर्पण आणि अटूट वचनबद्धतेने, आम्ही जीवनात परिवर्तन घडवून आणले आहे आणि हजारो लोकांच्या मनात आशा जागवली आहे. आमच्या प्रभावी उपक्रमांद्वारे, आम्ही वंचितांचे उत्थान करण्याचा आणि शिक्षण, आरोग्य,पर्यवरण सेवा आणि संधी सर्वांना उपलब्ध असल्याने त्या द्वारे प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा व एक आत्मनिर्भर समाज निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
शिक्षण
समग्र आणि सर्व समावेशक शिक्षण देण्याचा आमचा निर्धार आहे.विद्यार्थांसाठी कौशल्यपूर्ण शिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचा व त्यांना तज्ञान विविध उद्योगाचे प्रशिक्षण आणि मार्गदशन देऊन आत्मनिर्भर बनवण्याचा संकल्प निर्धारित केला आहे.
आरोग्य
महिला व बाल ह्यांच्या आरोग्य विषयक जनजागृती तसेच गर्भवती महिलांसाठी विशेष तज्ञान कडून समुपदेशन व आरोग्य तपासणी. ह्या बरोबर वृद्ध व्यक्तीसाठी नेत्र चिकित्सा व मोफत चेश्मे वितरण आणि आरोग्य तपासणी व रोग निदान शिबीर आयोजित करून ह्या शिबाराच्या माध्यमातून रोग मुक्त समाज घडवण्याचा आमचा निर्धार आहे.
शेतकरी विषयक
शेतकर्यांना आधुनिक शेती प्रशिक्षण. शेंद्रीय शेती प्रशिक्षण व मार्गदशन माती परीक्षण व समुपदेशन गट शेतीसाठी नियोजन आणि मार्गदर्शन बाजारपेठ विषयक मार्गदर्शन करून सशक्त व आत्मनिर्भर शेतकरी घडवण्याचा आमचा निर्धार आहे.
सामाजिक जन जागृती
समाजातील आरोग्य पर्यावरण शिक्षण विषयात जन जागृतीच्या माध्यामतून एक जागृत समाज घडवण्याचा आमचा निर्धार आहे.
उद्दिष्टे
2030 पर्यंत 20,000 महिला आणि तरुणांना संघटित करणे कौशल्य पूर्ण शिक्षण देऊन रोजगार आणि उद्योग उभारण्यास मदत करणे आणि त्यांची क्षमता वाढवणे.
पर्यवरण समतोल राखण्यासाठी 2030 पर्यंत 10,000 झाडे लाऊन त्याचे संगोपन करून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि प्लास्टिक मुक्त पर्यवरण करण्यासाठी जन जागृती करणे
कायमस्वरूपी आणि हंगामी स्थलांतरित, अपंग एकल महिला, मुले, वृद्ध लोक आणि वंचित लोकांची आरोग्य तपासणी आणि त्यांच्या मुलांची शैक्षणिक मदत करणे व शाळेत दखल करून वेळो वेळी पाठ पुरावा करून भविष्यात गुणवत्तापूर्ण जीवनशैली सुधारण्यासाठी निर्भर बनवणे
रासायनिक खतांचा वापर कमी करणे, सेंद्रिय शेतीचे संवर्धन करणे आणि जैवविविधता राखणे, मोठ्या प्रमाणावर पाणी आणि रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे त्याचा माती, मानव, प्राणी यांच्यावर होणारा परिणाम यासाठी समाजाला जागरूक करणे.
व्हिजन
समाजातील प्रत्येक व्यक्तीला आत्मनिर्भर बनुवून सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार मिळवून देणे.
मिशन
लोकांना त्यांच्या कृती आणि बदलाची क्षमता शोधून काढण्यासाठी.
सक्षम समाजासाठी व्यक्ती व्यक्ती जोडून कलह मुक्त कुटुंब निर्माण करण्यासाठी.
पारंपारिक व्यवसायाला पुनर्जीवित करून त्याला बाजारपेठेशी जोडून देण्यासाठी
व्यक्ती, कुटुंब, समुदाय आणि समाज यांना त्यांची उत्पादकता सुधारण्यासाठी हस्तक्षेप कौशल्यांसह सक्षम करणे.
व्यसन मुक्त समाज निर्माण करण्यासाठी.
आमचा विश्वास सर्वांना समान अधिकार.
सर्वांना समान संधी.
गरजू आणि आश्रित लोकांची संभाव्य शक्ती.
सर्वांसाठी सामाजिक सलोखा आणि शांतता.
धर्म आणि संस्कृती संवर्धन आणि व्यक्तीच्या संपूर्ण विकासासाठी निवड, अभिव्यक्ती आणि निर्णय स्वातंत्र्य
Logo Section
Books & Pencil
Represents of education & knowledge, reflecting the organization's focus on education.
Newborn Baby
Symbolizes child welfare and care for children. highlighting the organization's in this area.
Search
Signifies exploration, research, and discovery, reflecting the organization's commitment to advancing science and technology.
Wave
Represents the environment, suggesting the organization's efforts towards environmental conservation and protection.
DNA
Symbolizes medical assistance and healthcare, reflecting the organization's work in supporting health-related initiatives.
Wheat
Represents farmer support, agriculture, and food security, highlighting the organization's efforts to support farmers and promote sustainable agriculture.
Technology
Symbolizes technology advancement, reflecting the organization's focus on using technology for social good and advancement.
Plant
Symbolizes tree planting and environmental conservation, reflecting the organization's commitment to environmental sustainability.
Hand
Represents helping hands and support, reflecting the organization's focus on providing assistance and support to those in need.
Heart
Symbolizes emotional support and compassion, reflecting the organization's commitment to providing emotional support to individuals.
Recycle
Represents recycling initiatives and environmental sustainability, highlighting the organization's efforts towards recycling and waste management.
Woman
Symbolizes women empowerment, reflecting the organization's focus on empowering women and promoting gender equality.
Youth
Represents youth development and empowerment, reflecting the organization's efforts to support and empower young people.